Monday, February 9, 2009

kartiki gaikwad idea sa re ga ma pa lil champs 2009 winner


"KARTIKI DEVICHA VIJAY ASO "

kartiki gaikwad wins the sa re ga ma pa lil champs title beatingprathmesh laghate, Kartiki brought so many new songs to Little Champs. Most of her songs were such that people were hearing those for d first time.

मुंबई - तब्बल सहा महिने महाराष्ट्रासह अवघ्या जगाला आपल्या जादुई गायकीने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांचे पंचप्राण बनलेल्या "सारेगमप'च्या "लिटील चॅम्प्स'नी आज महाअंतिम फेरीसाठी हजारोंच्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांवरही गारूड केले. सर्व स्तरावरून पाचही "लिटील चॅम्प्स'ना विजयी करा, असा आग्रह वाढत गेल्याने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात शेवटपर्यंत चुरस कायम होती. अखेर भावगीत, भक्तिगीत, गजल, लावणी आणि शास्त्रीय संगीत अशा साऱ्या प्रकारातली गायकी लीलया सादर करणाऱ्या आळंदीच्या कार्तिकी गायकवाडने "महाराष्ट्राचा उद्याचा आवाज' पदावर मोहोर उमटवली. परीक्षक आणि ज्युरींनीही प्रेक्षकांची निवड सार्थ ठरवीत कार्तिकीला आपली पसंती दिली. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी कार्तिकीचे नाव "लिटल चॅम्प'ची विजेती म्हणून जाहीर करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. खचाखच भरलेल्या मैदानात एकच जल्लोष उडाला. मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत यांना उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले.संगीताच्या पुढील शिक्षणासाठी पाचही स्पर्धकांना "झी मराठी'तर्फे स्कॉलरशिप देण्यात आली आहे. कार्तिकीला "झी'तर्फे दोन लाखांचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकीट आणि दोन लाखांची स्कॉलरशिप देऊन गौरविण्यात आले. उर्वरित चारही स्पर्धकांना उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांना "झी'तर्फे प्रत्येकी दोन लाखांची स्कॉलरशिप आणि एक लाखांचे नॅशनल सर्टिफिकीट देण्यात आले.कार्तिकीबरोबरच रत्नागिरीचा प्रथमेश, अलिबागची मुग्धा, लातूरचा रोहित आणि पुण्याची आर्या यांच्यात कमालीची चुरस होती. वारकरी संप्रदायात वाढलेल्या कार्तिकीने पूर्ण स्पर्धेत जितक्‍या आत्मीयतेने अभंग सादर केले तितक्‍यचा प्रभावीने तिने उडत्या चालींची गाणी सादर करून परीक्षकांबरोबच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे, "कॉलबॅक' एपिसोडद्वारे कार्तिकीने स्पर्धेत पुनरागमन केले होते. म्हणूनच तिचे आजचे यश उल्लेखनीय ठरते.