- Homemain page
- Aboutthe author
- Contact ussay hello
- Infocraz Web Solutions
- Subscribe to RSSkeep updated!
More From Infocraz
Sunday, October 26, 2008
विलास देशमुखांना खुले पत्र.
बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना "माननीय" असे संबोधण्याची प्रथा आहे. पण आपणाबाबत आता असे म्हणावेसे वाटेनासे झाले आहे. गेल्या काही
वर्षात आपण व आपल्या पक्षाने महाराष्ट्राचे नक्की काय भले केले काही कल्पना नाही. मुंबईत बड्या बिल्डरांचे मॉल्स आलेत, गिरणगावातून मराठी
हद्दपार होतेच आहे, शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, विजेचा प्रश्न तसाच, टाटांची नॅनो महाराष्ट्राला हुलकावणी देऊन
गुजराथाला निघून गेली. गेली काही वर्ष आपण मुंबईला शांघाय करण्याच्या वावड्या उठविल्या होत्या. ते कधी आणि कसे होणार त्याचा काहीच पत्ता नाही, (मुबईत जागांचे भाव मात्र शांघाय सारखेच !). परंतु, आपण आता मुंबईचे उत्तरप्रदेश अथवा बिहार नक्कीच कराल ह्याबद्दल अजिबातच शंका नाही.
नुकत्याच झालेल्या राज ठाकरेंच्या अटकेनंतर आपण नक्की कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहात असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऐन दिवाळी व छठ पूजेच्या निमित्ताने आपण उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांना दिलेली हि भेटच! राज ठाकरेंच्या हक्क मागण्याच्या पद्धतीबद्दल आक्षेप असणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांचे मुद्देही तितकेच योग्य आहेत. आपण त्यांच्या कृतीबद्दल त्यांना तुरुंगात डांबले आणी ज्या मुद्द्यासाठी मनसेने आंदोलन
केले त्या मुद्द्याला मात्र जाणीवपूर्वक बगल दिलीत. लालू यादव ह्यांनी मात्र आपल्या लोकांची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या लोकांच्या रेल्वे भरतीच्या आड येणाऱ्या रा़ज ठाकरेंना तुमच्यातर्फे अटक करविली. आपल्या लोकांसाठी रेल्वेची परीक्षा पुन्हा घेण्याची घोषणा केली व मुंबईत छठपुजेचीही ( मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून ) पुरेपूर सोय करून घेतली.
आपल्याच बरोबरीने, शिवराज पाटीलही राजवर तितक्याच जोमाने लोकसभेत कडाडले ( हाच कणखरपणा त्यांना अतिरेक्यांच्या बाबतीत मात्र दाखवता आला नाही. ). राज ठाकरेचे विचार मराठी माणसाला मान्य नाहीत अश्या आशयाचे (हास्यास्पद)विधानाही त्यांनी केले. आपल्या काँग्रेसचे महाराष्ट्रातले
इतर खासदारही रेल्वे नोकर भरती संबंधी काहीही आवा़ज उठविताना दिसले नाहीत. पाटलांच्या वक्तव्यावरून त्यांची आणि काँग्रेसची, मराठी माणसांशी
नाळ किती जुळतेय ते लक्ष्यात आले. आपणही, राज ठाकरेंच्या नावाने मराठी माणसांच्या भावनांना मिळणारी वाट, त्यांना अटक करून बंद केलीत. राज ठाकरेंच्या अटकेनंतर आपण रेल्वेभरतीबद्दलही तितकेच आग्रही आणि मराठी हितसंरक्षणासाठी काही घोषणा केली असती, तर आम्हाला तुम्ही आमचे आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटला असता. परंतु महाराष्ट्राच्या मागण्यांसाठी आमचे दिल्लीतील प्रतिनिधी काहीही करत नाहीत हे राजचे
म्हणणे आपण आणि आपल्या पक्षाच्या खासदारांनी सत्य करून दाखविले.
पटण्यामध्ये आज राजच्या अटकेच्या बातमीने फटाके फुटत होते. वर त्यांना परीक्षा पुन्हा देण्यासंबंधी घोषणाही झाली होती. माघारी परतल्यावर
त्यांनी तिथे केलेली स्टेशनची नासधूस ही काही "मिडिआवाल्यांसाठी" बातमी नव्हतीच. इथे, मात्र राजही अटकेत, रेल्वेभरतीबद्दल मराठी माणसांवर होत
असलेल्या अन्यायाबद्दल आपणाकडून एक शब्दही नाही! आपण व आपल्या पक्षाने, राष्ट्रवादी ( महाराष्ट्रवादी नाही ) काँग्रेसबरोबर मिळून आपल्याच मराठी
माणसाला दिलेली ही दिवाळी भेट अवघा महाराष्ट्र नेहमीचं लक्षात ठेवेल ह्यात अजिबात शंका नाही. ह्यापुढे मात्र आपणास निवडणूक लढवायची
Subscribe to:
Post Comments (Atom)
Its me
featured-video
Watch Cricket Live Online
Watch FIFA World Cup 2010 Live Online
Followers
Categories
- 3 idots (1)
- Amir khan (1)
- amirkhan amirkhan (1)
- Articles (2)
- car (1)
- Cricket Reviews (1)
- Cricket Scores (1)
- Damlelya babachi goshta (1)
- ferrari (1)
- ferrari engine (1)
- gajni (1)
- ICC Champions Trophy (2)
- ICC Champions Trophy 2009 (1)
- ICC Champions Trophy Schedule (2)
- ICC Champions Trophy Schedule 2009 (2)
- india (1)
- india vs pakistan score (1)
- india vs srilanka (1)
- latest cars (1)
- latest ferrari model (1)
- Latest News (1)
- live match score (3)
- match status (1)
- News (2)
- News India (3)
- srilanka (1)
- Tatas Nano Flats (1)
- three idots (1)
- World News (3)
featured-content2
featured-content2
My Blog List
Category
- 3 idots (1)
- Amir khan (1)
- amirkhan amirkhan (1)
- Articles (2)
- car (1)
- Cricket Reviews (1)
- Cricket Scores (1)
- Damlelya babachi goshta (1)
- ferrari (1)
- ferrari engine (1)
- gajni (1)
- ICC Champions Trophy (2)
- ICC Champions Trophy 2009 (1)
- ICC Champions Trophy Schedule (2)
- ICC Champions Trophy Schedule 2009 (2)
- india (1)
- india vs pakistan score (1)
- india vs srilanka (1)
- latest cars (1)
- latest ferrari model (1)
- Latest News (1)
- live match score (3)
- match status (1)
- News (2)
- News India (3)
- srilanka (1)
- Tatas Nano Flats (1)
- three idots (1)
- World News (3)
Powered by Blogger.
No comments:
Post a Comment